Bhor Crime: भोर तालुका हादरला, साडेतीन वर्षाच्या बालिकेचा खून; गावात तणावाचं वातावरण

bhor crime news today: आरोपी ताब्यात, नसरापूरमध्ये तणावाचे वातावरण
narsapur pune crime
narsapur pune crimePudhari
Published on
Updated on

Bhor Pune Latest News

नसरापूर : एका वयोवृद्धाने नसरापूर येथे रस्त्याने खेळत जाणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीला फसवून गोठ्यात नेऊन खून करण्याची घटना घडली आहे. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्याला तातडीने आरोपीने ताब्यात घेतले आहे. मात्र आरोपीला जागेवरच फाशीच शिक्षा देण्याचा पवित्रा घेत नसरापूर ग्रामस्थानी मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नकार देत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.

नसरापूर ( ता. भोर ) येथील राममंदिर लगत एका साडेतीन वर्षाच्या मुलीचे खून झाल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्य सुमारास उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार भीमा कांबळे वय ६० रा. साळवडे ( ता. भोर ) असे नराधम आरोपीचे नाव असून त्याने खाऊचे आमिष दाखवून जनावराच्या गोठ्यातील पत्रावजा खोलीत खून केल्याची कबुली राजगड पोलिसांना दिली. मुलगी दिसत नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता एका खासगी घरमालकाच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी हा मुली समवेत कैद झाला आहे. मात्र ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

narsapur pune crime
Buldhana Crime | पंजाबच्या 'हार्वेस्टर आपरेटर'चा खूनच झाल्याचे उघड, साखरखेर्डा पोलिसांनी सात तासात लावला छडा : एका संशयिताला अटक

सध्या साडेतीन वर्षाच्या बालिकेच्या दुर्दैवी खूनप्रकरणी महिला आणि नागरिक आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीने लहान मुलीवर खून करून इतर घृणास्पद अत्याचार केले आहे का? हे शवविच्छेदा नंतर स्पष्ट होण्याचे संकेत राजगड पोलिसांनी दिले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसे तज्ञ स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक हजर झाले आहे.

narsapur pune crime
Pune Crime News: पुणे हादरलं! दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून ११ महिन्यांच्या पोटच्या मुलाचा आईने केला खून

नसरापूरकरांचे डोळे पाणावले

हृदयद्रावक घटने कुटुंबाचा आक्रोश पाहून घटनास्थळी हजर असलेल्या ग्रामस्थांचे मन हेलावले तर निष्पाप लहान चिमुरडी मुलीचा खून झाल्याची घटना घडल्याने नसरापूर गावातील महिला आणि ग्रामस्थांच्या डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news