पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन, उद्घाटन

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन, उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि.14) गोल्फ चौकातील उड्डाणपुलासह विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केली जाणार आहेत. येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन दोघांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.

या पुलास 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल' असे नाव देण्यात आले आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करून बीआरटी मार्ग, बावधन बु. येथील गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्याने करण्यात आलेली पाईनलाईन असे तीनही कामांचे भूमिपूजनही या वेळी होणार आहे. येरवडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर येथे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news