Bhatghar Dam: भाटघर धरण १०० टक्के भरले; वेळवंडी नदीत २,६१५ क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बारामती-सोलापूरसाठी महत्त्वाचे येसाजी कंक जलाशय यंदा १५ दिवस आधी ओव्हरफ्लो; निरा देवघर धरणही ९८ टक्के भरले
Bhatghar Dam
Bhatghar DamPudhari
Published on
Updated on

भोर: बारामती, सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) रविवारी (दि. २) दुपारी ४.३० च्या सुमारास १०० टक्के भरले. वीजनिर्मिती केंद्र व ४५ स्वयंचलित दरवाजांतून वेळवंडी नदीपात्रात २,६१५ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी सांगितले.

Bhatghar Dam
Maharashtra Rural Electricity Crisis: धरणे तुडुंब, वीजनिर्मिती सुरू; तरी गावांमध्ये अंधार कायम! ८ ते १० तास भारनियमनावर शेतकऱ्यांचा संताप

दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेने धरण यंदा १५ दिवसांनी लवकर भरले. भोर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे, मळे, पांगारी परिसरात होत असलेल्या पावसाने धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

Bhatghar Dam
Khadakwasla Dam Water Discharge: खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरूच; २४ हजार क्युसेकनंतर पाणी सोडण्याचा वेग कमी

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस भाटघर धरण १०० टक्के भरले. भाटघर धरणाची साठवणक्षमता २३ टीएमसी आहे. एकूण ८१ दरवाजे असून, ४५ स्वयंचलित, ३६ अस्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजातून १००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Bhatghar Dam
Pune Friendship Day Celebration: पुण्यात मैत्री दिनाचा जल्लोष; कॅफे, मॉल, रस्ते आणि सोशल मीडियावर तरुणाईचा उत्साह

निरा देवघर ९८ टक्के भरले

हिर्डोशी खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने निरा देवघर धरण ९८ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५०, तर सांडव्यातून २४२१ असा एकूण ३१७१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भाटघर धरणक्षेत्रात ७२२, निरा देवघर १५५७, गुंजवणी १६४१, वीर ३५६ असा एकूण ३९३८ मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news