भोर: धरण परिसरात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर व निरा देवघर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.27) सकाळी भाटघर धरणात 39.29 तर निरा देवघर 31.57 टक्के पाणी साठा झाला होता.
भाटघर धरणात 2 जूनरा एकूण मृतसाठा 7.15 तर नीरा देवघर धरणात 9.38 टक्के पाणी साठा होता. 27 जूनच्या सकाळपर्यंत भाटघर धरण परिसरात एकूण 291 मिलिमीटर तर निरा देवघर धरण क्षेत्रात 577 मिलिमीटर मीटर पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर व निरा देवघर धरणात 30 टक्के जास्तीचा पाणी साठा आहे. (Latest Pune News)
तालुक्याच्या सर्वच भागात पाऊस पडत असल्यामुळे ओढे - नाले , भात शेतीतून पाणी झाले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरणात यंदा जून मध्येच 69.80 टक्के पाणी साठा झाला आहे.
27 जूनची पाणीसाठ्याची टक्केवारी, पाऊस मि.मी.मध्ये
धरण पाऊस टक्केवारी
भाटघर 39.29 291
निरा देवघर 31.57 577
वीर 69.80 134
गुंजवणी 56.78 791