पुणे : सावधान… राज्यात पुन्हा मुलींची संख्या घटतेय!

पुणे : सावधान… राज्यात पुन्हा मुलींची संख्या घटतेय!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एकीकडे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' कार्यक्रम जोशात सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, वास्तवात लिंग गुणोत्तर प्रमाणात राज्य पुन्हा एकदा 'बॅकफूट'वर गेल्याचे चित्र आहे. राज्य आरोग्य विभाग आणि नागरी नोंदणी प्रणालीनुसार राज्यात कोरोना काळात लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये 906 पर्यंत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्म गुणोत्तर प्रमाण दर हजार मुलांमागे 900 हून कमी आले आहे.

पुण्यातही मुलींचे प्रमाण घटले ः पुणे जिल्ह्यामध्ये 2017 मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 925 इतके होते. मुलींचे प्रमाण 2018मध्ये 914, 2019 मध्ये 905, 2020 मध्ये 924 असे पाहायला मिळाले. 2021 मध्ये त्यात काहीशी घट झाली असून, प्रमाण 911 इतके आहे. गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 962 इतके आहे.

राज्यात धक्कादायक नोंद ः राज्यात 2021 च्या आकडेवारीनुसार 35 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये मुलींचे लिंग गुणोत्तर दर हजार मुलांमागे 900 पेक्षा कमी आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, वाशीम आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात दोन वर्षात 919 वरून 906 वर ः राज्यात प्रत्येक 1000 मुलांमागे मुलींचे जन्म गुणोत्तर 2020 मध्ये हे प्रमाण 913 एवढे होते. तेच 2021 मध्ये 1000 मागे 906 पर्यंत घसरले. सर्वांत कमी प्रमाण बुलडाणा जिल्ह्यात आहे.

'बेटी बचाओ…' राबविणे आवश्यक
बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राज्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. योजनेचे उद्दिष्ट घटते बाल
लिंग गुणोत्तर आणि मुली, महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आहे. गर्भलिंग निदान रोखणे, मुलीचे अस्तित्व, शिक्षण आणि सहभाग सुनिश्चित करणे, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

कोरोना काळातही गर्भलिंग निदान कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सतर्कता बाळगण्यात आली. राज्यातील मुले-मुलींच्या जन्म गुणोत्तर प्रमाणाचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे.
                                                             – डॉ. नितीन अंबाडेकर,
                                                        आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य

पुणे जिल्ह्याचे गुणोत्तर प्रमाण
मुलांचे प्रमाण : 70,756
मुलींचे प्रमाण : 65,388
मुलींचे गुणोत्तर प्रमाण : 924
मुलांचे प्रमाण : 72,796
मुलींचे प्रमाण : 66,335
मुलींचे गुणोत्तर प्रमाण : 911

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news