बेल्हे परिसराची डाळिंबाची ख्याती होऊ लागली लुप्त

बेल्हे परिसराची डाळिंबाची ख्याती होऊ लागली लुप्त

बेल्हे ; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजारांचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून या परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती लुप्त होऊ लागली आहे.संपूर्ण भारतात डाळिंब उत्पादनाने आळेफाटा, राजुरी, बेल्हे, घारगाव, आणे परिसराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातासमुद्रापार डाळिंब उत्पादनात नाव होते. सध्या या परिसरात डाळिंबाचे उत्पादन घटल्याने हा भाग आपली ओळख विसरतो की, काय अशी भीती व्यक्त होत आहे. परिसरात रोजगार नसल्याने स्थानिक मजुरांना उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे,नाशिक शहरात जावे लागत आहे. एकेकाळी परिसरात शेकडो मजूर बाहेरून कामाला येत. सध्या मात्र येथील भूमिपुत्रच मजुरीसाठी वणवण फिरताना दिसत असल्याची शोकांतिका आहे.

पंचक्रोशीतील शेतकर्‍यांची प्रयोगशील शेतकरी अशी ओळख होती. एकरी 100 टन उसाचे उत्पादन येथे काढण्यात आलेले आहे, तर डाळिंबामध्ये एकरी 5 लाखांपर्यंत उत्पादन घेतले आहे, त्यामुळे राज्य तसेच परराज्यातील अनेक व्यापारी, मजूर येथे कामानिमित्त येत असत. काही तर येथे कायमचे रहिवासी झाले. स्वत:चे घरदार करून आपला संसार येथेच थाटला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, लहरी निसर्ग व नानाविध आजारांचा प्रादुर्भाव यामुळे येथील डाळिंब शेती अखेरचा श्वास घेत आहे. त्याचा सरळ परिणाम परिसरातील अर्थकारणावर झाला असून याचा मोठा फटका मजूरवर्गाला बसत आहे, तर डाळिंब उत्पादकांना कोणते पर्यायी पीक घ्यावे, याची चिंता सतावत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news