शिरूर तालुक्यात कात्रज दूधभेसळीची पाळेमुळे?

शिरूर तालुक्यात कात्रज दूधभेसळीची पाळेमुळे?

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या काही भागांत बोगस दूधसंकलन केंद्र असण्याची शक्यता या व्यावसयिकांमधून व्यक्त होत आहे. निवडणुकीत उपयोग होत असल्याने काही बोगस संस्थांपासून भेसळीने वाढलेले दूध या संस्थेच्या नावे टाकण्याचे प्रकार तर होत नाहीत ना, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.  पुणे जिल्हा कात्रज दूध संघात दूध भेसळीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संघाच्या पदाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. शिरूर तालुक्यात ही भेसळीची पाळेमुळे असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी करण्याची खरी गरज आहे, अशी चर्चा दुग्ध वर्तुळात  चालू आहे.

भेसळ करून पाण्याचा पैसा करून राजकारणात वापरायचा, त्यावर निवडून आल्यावर पुन्हा भेसळ सुरू ठेवायची, अशी पद्धत रूढ झाली आहे. खरोखरंच दूध भेसळीवर कारवाई झालीच, तर मोठे बोके हाताला लागण्याची शक्यता आहे. दूध संघाच्या काही संचालकांचा हा गोरखधंदा बंद होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य दुग्ध व्यावसायिकाला पडला आहे. शिरूर तालुक्यात शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय शेतकरी करीत असतात. मानवी आहारात दुधाला महत्त्वाचे स्थान असल्याने दुधासाठी गाई, म्हशी, शेळ्या संगोपन केले जाते. सर्वसामान्य शेतकरी दुधाला योग्य दर मिळेल, या आशेने पुणे जिल्हा कात्रज दूध संघात निष्ठेने देतात. दूध व्यवसायात अनेक मध्यस्थ संस्था असतात. त्यामुळे दूध व दुधाचे उत्पादन हाताळण्यात नियंत्रण ठेवणे कठीण बनते. अश्या प्रकारे भेसळ होण्याची दाट शक्यता असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news