सांगवीत डॉक्टरला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

सांगवीत डॉक्टरला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा: जेवण करत असलेल्या डॉक्टरने दरवाजा न उघडल्याने पाच जणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना सांगवी (ता. बारामती) येथे घडली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा ऊर्फ अनिल संभाजी जगताप, विश्वजित आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप व अशोक शंकर जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात जमाव जमवणे, मारहाणीसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था यांना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. युवराज शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिली.  सांगवीमध्ये त्यांचे राहत्या घराबाहेरील खोलीमध्ये साई क्लिनिक आहे. दि. 6 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते ओपीडी संपवून घरात गेले. जेवणासाठी ते बसले असताना बाहेरून कोणी तरी जोरजोरात दरवाजा वाजवला. खिडकीची काच फोडली.

डॉक्टरांनी दरवाजा उघडला असता  हे पाच जण सुशील अशोक जगताप याला औषधोपचारसाठी घेऊन आल्याचे दिसले.  डॉक्टरांनी रुग्णाला आतमध्ये घेण्यास सांगितले. परंतु या वेळी पाच जणांनी त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांचा मुलगा विराज हा तेथे आला. त्याने वडिलांना का मारहाण करत आहात,अशी विचारणा केली. त्यावर त्यालाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news