BBA, BCA अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये बदल

BBA, BCA अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये बदल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए), संगणक उपयोजन (बीसीए) असे विविध विषयांचे अभ्यासक्रम राबवण्यात येतात. परंतु, विद्यापीठाने बीबीए अभ्यासक्रमांच्या नामाभिधानात बदल करून त्यांचा समावेश वाणिज्य पदवी (बी. कॉम), विज्ञान पदवी (बी. एस्सी) अंतर्गत करण्यात आला असून, बीबीए अभ्यासक्रम राबवण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता न घेतलेल्या महाविद्यालयांतील बीबीए, बीसीए अभ्यासक्रम आता बी. कॉम., बीएस्सी या नामाभिधानाने चालवावे लागणार आहेत. विद्यापीठाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

बीबीए, बीसीए अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत चालवण्यात येत होते. त्यात व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए), आंतरराष्ट्रीय व्यापार (आयबी), संगणक उपयोजन (बीबीए सीए), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) या अभ्यासक्रमांचा समावेश होता. परंतु, यंदा एआयसीटीईन बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रम स्वतःच्या अखत्यारित घेण्याचा निर्णय घेतला. तसेच हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी एआयसीटीईची मान्यता बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे महाविद्यालयस्तरावर होणारे प्रवेश या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सीईटी घेऊन आणि केंद्रीभूत पद्धतीने राबवण्याचा निर्णय झाला.

एआयसीटीईच्या या निर्णयाला काही संस्थाचालकांनी विरोध करून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याशिवाय हे अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अखत्यारित न जाण्यासाठी विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमांचे नामाभिधान बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांना एआयसीटीईची मान्यता घेतलेल्या महाविद्यालयांना एआयसीटीईच्या मान्यतेनुसार चालवणे बंधनकारक आहे. तसेच या अभ्यासक्रमांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयाने निर्देशित केलेल्या प्रक्रियेनुसार राबवले जातील. तर एआयसीटीईचो मान्यता न घेतलेल्या, मान्यतेसाठी अर्ज न केलेल्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे नामाभिधान बदलण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेला दोन्ही अभ्यासक्रमांचा आराखडा आणि अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

मान्यता, नामाभिधान, शुल्क याबाबत माहिती देणे गरजेचे

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अभ्यासक्रमांची मान्यता आणि नामाभिधान याबाबतची माहिती विद्यार्थी, पालकांना प्रवेशावेळी असणे गरजेचे आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचे शुल्क आणि इतर माहिती माहितीपुरि का, संकेतस्थळ, अन्य संपर्क साधनांमध्ये देणे गरजेचे आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news