पिंपरी : विरोधकांचे बिनबुडाचे आरोप; नियमानुसार कामकाज : बबनराव झिंजुर्डे

पिंपरी : विरोधकांचे बिनबुडाचे आरोप; नियमानुसार कामकाज : बबनराव झिंजुर्डे
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेत सन 2005 पूर्वी 65 टक्के थकबाकी होती. अनेक कर्मचारी नोकरी सोडून गेले. गेल्या 17 वर्षांच्या काळात सभासद, लेखा विभागाचे प्रमुख, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन तसेच, नियमानुसार कामकाज करून थकबाकी शून्यावर आणली आहे. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर दिले जात आहे, असे स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे प्रमुख बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.11) पालिका भवनात मतदान होत आहे. निवडणुकीत झिंजुर्डे, अंबर चिंचवडे व भोसले असे तीन पॅनल आहेत.

झिंजुर्डे यांनी सांगितले की, सन 2006-7 व 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाला आहे.तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे सलग 4 वर्षे सर्वोत्कृष्ट कामकाजचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. तत्पर सेवा व पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सतत ऑडीट वर्ग 'अ' मिळाला आहे.
पन्नास हजार रूपये कर्ज वितरण करणारी पतसंस्था 20 लाख पतपुरवठा करत आहे. कर्जदार सभासदांच्या मृत्युनंतर कर्ज माफ केले जाते. संस्थेचे कामकाज नियमानुसार सुरू आहे. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्या अफवांना संस्थेचे सभासद भीक घालणार नाहीत, असे विश्वास झिंजुर्डे यांनी व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news