बार्टी शिष्यवृत्ती देईना : शंभर दिवसांपासून आंदोलन सुरूच

बार्टी शिष्यवृत्ती देईना : शंभर दिवसांपासून आंदोलन सुरूच
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जातीमधील सुमारे 761 संशोधक विद्यार्थ्यांना सन 2022 ची अधिछात्रवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी बार्टी कार्यालयासमोर 100 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र याकडे शासनाने तसेच बार्टी आस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. ही बाब लक्षात घेऊन आता कृती समितीमधील 100 विद्यार्थी आजपासून (दि.29) बेमुदत उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिली आहे.

अनुसूचित जातीमधील 2022 सालामधील 761 संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती देण्यासाठी 100 दिवसांहून जास्त काळ आंदोलन सुरू आहे. मात्र, त्याकडे बार्टी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील 851 संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली तसेच महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी प्रवर्गातील 1226 संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली आहे. मात्र, बार्टीने 2022 सालामधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी अन्यथा 29 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे हर्षवर्धन दवणे, स्वप्नील नारबाग, संविधान दुगाणे, किरण फुगारे, अंकित राऊत यासह इतर सदस्यांनी दिला आहे.

  • सरसकट 761 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्या
  • विद्यार्थी आजपासून बसणार बेमुदत आमरण उपोषणास
  • बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीची माहिती

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news