स्वच्छ सर्वेक्षणात बारामतीची बाजी;देशातील 20 स्वच्छ शहरांमध्ये समावेश

स्वच्छ सर्वेक्षणात बारामतीची बाजी;देशातील 20 स्वच्छ शहरांमध्ये समावेश

बारामती : पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये बारामतीने यंदाही बाजी मारली आहे. मध्यप्रदेशला मागे टाकत यंदा महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला. त्यात अपेक्षेप्रमाणे बारामतीनेही जोरदार कामगिरी करत देशात 18 वा क्रमांक मिळविला. देशातील पहिल्या 20 स्वच्छ शहरांमध्ये बारामतीचा समावेश झाला आहे.लोकसंख्यानिहाय विचार करता एक ते तीन लाखांच्या दरम्यान देशातील 20 शहरात बारामती हे एकमेव शहर ठरले आहे.

बारामतीने या स्पर्धेत 7968 गुण प्राप्त केले असून देशात प्रथम आलेल्या इंदूर शहराने 9348 गुण मिळविले आहेत. इंदूरची लोकसंख्या 20 लाखांपेत्रा अधिक आहे. बारामतीची लोकसंख्या 1 लाख आठ हजार इतकी आहे. देशातील पहिल्या 20 स्वच्छ शहरांमध्ये समावेश झाल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात बारामती स्वच्छ, सुंदर असावी यासाठी प्रयत्न केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व अन्य अधिकारी वर्ग, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी त्यात मोठे योगदान दिले. विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, महिला गट, व्यापारी वर्ग, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांनीही त्यात योगदान दिले. परिणामी बारामती देशातील पहिल्या 20 स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट होवू शकली.

गतवर्षी एक ते तीन लाक लोकसंख्येचा स्वतंत्र गट केला गेला होता. यंदा मात्र केंद्राने एक लाख व त्याहून अधिक लोकसंख्येच्या शहरांना एकाच श्रेणीत आणले. यात एक लाखांपासून ते एक कोटी लोकसंख्येपर्यंतची सर्वच शहरे समाविष्ट झाली. लोकसंख्येचा विचार करता बारामती देशात प्रथम क्रमांकावरच आहे असे म्हणावे लागेल. बारामतीच्या पुढे असलेल्या देशातील सर्व 17 शहरांची लोकसंख्या बारामतीहून अधिक आहे. स्वच्छ शहर असा नावलौकिक असलेले म्हैसूर शहर बारामतीपेक्षा पाच क्रमांकांनी खाली घसरले असून त्यांचा 23 वा क्रमांक आहे. देशातील टॉप 20 मध्ये राज्यातील नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती व मिरा भाईंदर या 5 शहरांचा समावेश आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news