

बारामती: व्हॉट्सॲप लिंकद्वारे एक ग््रुाप जॉईन करत ॲपद्वारे ट्रेडिंगच्या नादात 1 कोटी 30 लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार बारामतीत घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या बॅंक खात्यातील 44 लाखांची रक्कम गोठवली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा वेगवान तपास केला जात असून, अपहृत रक्कम मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विवेक अरविंद कुंभोजकर (रा. रामचंद्र मलुकचंदनगर, अशोकनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली होती. एका व्हाट्सॲप ग््रुापच्या माध्यमातून फिर्यादीला ग््रुापधारकांनी शेअर मार्केटींगचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲप ग््रुापवरील सर्व सदस्यांना ऋअठङएधङङउ या एकाच ॲपवर घेत असल्याचे सांगत ॲपची लिंक दिली गेली. या ॲपद्वारे ट्रेडिंग करण्यासाठी सुरुवातीला 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार फिर्यादीने 25 फेबुवारी रोजी बॅंक ऑफ बडोदाच्या कुर्ला, मुंबई येथील एका खात्यावर ही रक्कम भरत ट्रेडिंग सुरू केले. त्यानंतर ट्रेडिंगसाठी रक्कम कमी पडत असल्याचे वेगवेगळ्या बॅंक खात्यावर रक्कम भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीने 25 फेबुवारी ते 18 मार्च या कालावधीत एकूण 1 कोटी 30 लाख 2 हजार रुपये भरले. त्यानंतरही कोणताही परतावा न देता त्यांची बनावट ॲपद्वारे ऑनलाइन फसवणूक केली गेली. फिर्यादीने यासंबंधी दि. 23 मार्च रोजी सायबर हेल्पलाइनद्वारे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांतही फिर्याद दिली होती.
तांत्रिकदृष्ट्या या गुन्हाचा तपास केला जात असून, या संपूर्ण पद्धतीवरून हा गुन्हा अत्यंत नियोजनपूर्वक, संघटित सायबर फसवणूक रॅकेटमार्फत घडवून आणला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे चिवडशेट्टी म्हणाले. तपास पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव, हवालदार सुलतान डांगे, यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, सागर जामदार, अक्षय सिताफ, सुरज घाटे, विशाल शिंदे, गिरीश नेवसे या पथकाने दोघा संशयितांना अटक केली आहे.
आरोपींनी ही रक्कम एटीएमद्वारे काढून मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून एका खात्यावर भरली आहे. ती गोठवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अटक आरोपींच्या मदतीने मुख्य आरोपी, त्यांचे आर्थिक व्यवहार, टेलिग््रााम, व्हाट्सॲप व इन्स्टाग््राामद्वारे कार्यरत असलेले सायबर फसवणूक जाळे आणि त्यामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चिवडशेट्टी यांनी सांगितले.