Baramati Rain: दीड महिन्यापासून पावसाची दडी! बारामतीत उन्हाचा तडाखा वाढला; शेतकरी चिंतेत, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

बारामती तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने उन्हाचा कडाका आणि उकाडा वाढला आहे. शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.
Baramati Rain
Baramati RainPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. दिवसभर कडक ऊन आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी बरसतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाऐवजी उन्हाचा तडाखा वाढल्याचे चित्र तालुक्यात आहे.

Baramati Rain
Gauri Festival Market Pune: गौराईच्या आगमनाने फुले, फळे अन् भाज्यांना 'भाव'

सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, उकाड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात सर्वसाधारणपणे दिसणारे रेनकोट, छत्र्या आता कमी प्रमाणात दिसत असून, नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल आणि स्कार्फचा आधार घेतला आहे.

दुचाकीस्वारांकडूनही उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाय केले जात आहेत. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गणपतीला पावसासाठी साकडे घातले आहे. काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतीबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

शेतीला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले

पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज भासत आहे. विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध पाणीसाठ्यावर शेती अवलंबून आहे. पाऊस आणखी लांबल्यास पिकांवर त्याचा परिणाम होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.

Baramati Rain
Pune Ganpati Festival: पुण्यातील गणेशोत्सवाचे भव्य देखावे ठरले आकर्षण; पेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होण्यावरही परिणाम होत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. साठवून ठेवलेला चारा संपत चालल्याने आगामी काळात पशुपालकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news