Pune Ganpati Festival: पुण्यातील गणेशोत्सवाचे भव्य देखावे ठरले आकर्षण; पेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी

नारायण पेठेतील श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्टच्या ८३ व्या वर्षानिमित्त ‘कथा आदिशक्तीची दशामहाविद्याची’ हा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
Pune Ganpati Festival
Pune Ganpati FestivalPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य पुण्यातील पेठांमध्ये भव्य-दिव्य देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. ऐतिहासिक प्रसंगांपासून ते पौराणिक कथांपर्यंत आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी यंदाचा उत्सव अधिकच खुलून गेला आहे.

''कथा आदिशक्तीची दशामहाविद्याची'' हा आकर्षक देखावा

नारायण पेठेतील श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्टने यंदा ८३ व्या वर्षात पदार्पण केले असून, 'कथा आदिशक्तीची दशामहाविद्याची' हा आकर्षक देखावा साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर व उपाध्यक्ष केदार काटे आहेत.

Pune Ganpati Festival
Pune Ganesh Mandal Social Awareness: गणरायाच्या नैवेद्यात भेसळ नको! भिंग घेऊन ‘मोदक तपासणारे’ तुकाराम मुंढे देखाव्यात

अलिबाबा चाळीस चोर, खुल जा सिम सिम

८८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या भरत मित्रमंडळाने अलिबाबा चाळीस चोर (खुल जा सिम सिम) हा जिवंत देखावा सादर करून बालचमूंसह भाविकांची मने जिंकली आहेत. मंडळाचे अध्यक्ष निरंजन बाळासाहेब दाभेकर यांनी या देखाव्याच्या आयोजनाचे नियोजन केले.

'अफजलखान वध' हा जिवंत देखावा

सदाशिव पेठेतील खालकर चौक मित्रमंडळाचे ५४ वे वर्ष असून, त्यांनी 'अफजलखान वध' हा जिवंत ऐतिहासिक प्रसंग साकारला आहे. अध्यक्ष चिन्मय अभ्यंकर, उपाध्यक्ष गौरव भागवत, कार्याध्यक्ष चैतन्य कानडे आणि आधारस्तंभ अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनात हा देखावा सादर होत आहे.

काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह

श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा हा भव्य पौराणिक जिवंत देखावा. ५५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या नवजवान मित्रमंडळाने (८२८, सदाशिव पेठ) 'श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा' हा भव्य पौराणिक जिवंत देखावा साकारला आहे, जो पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष रवींद्र कंधारे, अध्यक्ष चंद्रकांत केळुसकर व उत्सवप्रमुख आशुतोष धोडमिसे आहेत.

Pune Ganpati Festival
Pune Coconut Market: भाव उतरल्याने नारळ विक्री सुसाट; गुलटेकडी मार्केट यार्डातून दररोज अडीच लाख नारळांची विक्री

'चेन्नकेश्वर विष्णू मंदिराची' हुबेहूब प्रतिकृती

१३५ वर्षांची उत्तुंग परंपरा लाभलेल्या छत्रपती राजाराम मंडळाने कर्नाटक येथील बेल्लूरच्या प्रसिद्ध 'चेन्नकेश्वर विष्णू मंदिराची' हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. कलाकार शंकर वसकुटे यांनी हे मंदिर साकारले असून मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आहेत.

'कालिया मर्दन' हा पौराणिक देखावा

अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या १३४ व्या वर्षांनिमित्त 'कालिया मर्दन' हा पौराणिक देखावा साकारण्यात आला असून, अध्यक्ष श्याम मानकर यांच्या नेतृत्वात हा उत्सव साजरा होत आहे. तसेच ग्राहक पेठ मंडळाच्या ३० व्या वर्षांनिमित्त बिस्किटांपासून बनवलेले आकर्षक मंदिर साकारण्यात आले आहे.

अजून पाहावेत असे प्रमुख देखावे

  • श्री गरूड गणपती मंडळ (नारायण पेठ) : कथा आदिशक्तीची दशामहाविद्याची देखावा.

  • भरत मित्रमंडळ (नारायण पेठ) : 'अलिबाबा चाळीस चोर' हा जिवंत देखावा.

  • खालकर चौक मित्रमंडळ (सदाशिव पेठ) : 'अफजलखान वध' ऐतिहासिक जिवंत प्रसंग.

  • नवजवान मित्रमंडळ (सदाशिव पेठ) : 'श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी विवाह सोहळा'.

  • छत्रपती राजाराम मंडळ (सदाशिव पेठ) : बेल्लूर येथील चेन्नकेश्वर विष्णू मंदिराची भव्य प्रतिकृती.

  • अखिल नवी पेठ हत्ती गणपती : कालिया मर्दन देखावा.

  • ग्राहक पेठ (टिळक रस्ता) : बिस्किटांपासून साकारलेले अनोखे मंदिर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news