

बारामती: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतचा अंतिम निर्णय आता पक्ष घेईल, असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रीकरणाच्या निर्णयाचा चेंडू ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात टोलवला. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय वैयक्तिक नसून पक्षाचा असल्याचे सांगितले.
यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय खा. सुप्रिया सुळे आणि राज्यातील इतर नेते घेतील, असे म्हटले होते. मात्र खा. सुळे यांनी पुन्हा हा चेंडू प्रत्यक्षरीत्या शरद पवारांच्या कोर्टात टाकला आहे. (Latest Pune News)
आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आषाढी वारीपूर्वी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि मी बहीण-भाऊ आहोत आणि मिटकरींच्या इच्छेबद्दल मी आभारी आहे. मात्र, एकत्रीकरणाचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी, फडणवीसांना मत मांडण्याचा अधिकार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा असून ाहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.