Mumbai Drugs Case Arrest: मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक

५० लाखांच्या ड्रग्ज प्रकरणात बारामती पोलिसांची मोठी कामगिरी; वसईतील आरोपीला हुशारीने पकडले
मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक
मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटकPudhari
Published on
Updated on

बारामती: मुंबईतील 50 लाखांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत गजाआड केले आहे. समीर ऊर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय 20, रा. वसई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Pune News)

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक
ZP Election: पणदरे-सांगवीमध्ये अजितदादांची पसंती कोणाला? जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस वाढली

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलिस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात दि. 14 सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक
Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत ६६०० क्युसेकने विसर्ग सुरू

यापैकी समीर ऊर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय 20, रा. वसई) हा फरार असून, बारामती परिसरात असल्याची माहिती वसई- विरार पोलिस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून, ‌‘बँड रिव्हर‌’ या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक
Water Tanker Scam: धायरीत महापालिकेच्या टँकरचालकांकडून नागरिकांची उघडी लूट

यानंतर पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. बारामती पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपूर्त करण्यात आले.

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत अटक
Document Registration Offices: राज्यात खासगी दस्तनोंदणी कार्यालयांना गती; सहा महिन्यांत सुरू होणार 60 केंद्रे

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलिस अंमलदार नीलेश वाकळे, राहुल लांडगे यांच्या पथकाने केली. शेख याला मीरा भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news