Baramati Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य; नृत्यांगणांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक येथील प्रकार; डॉल्बीच्या तालावर अश्लील हावभाव केल्याप्रकरणी सात जणांवर पोलिसांची कारवाई
Police
PolicePudhari
Published on
Updated on

बारामती: कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) गावच्या हद्दीत मतकरवस्ती, माळशिकारेवाडी येथे सार्वजनिक गणोशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये अश्लिल हावभावासह बिभस्त नृत्य करणाऱ्या नृत्यांगणांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Police
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; ३८ घाट, ८१२ लोखंडी टाक्यांची व्यवस्था

याप्रकरणी नृत्य करणाऱ्या राधा संग्राम घुले (वय २९), मिनाक्षी बापूराव रुपनवर (वय ३५), काजल नितीन शिंदे (वय २६, सर्व रा. लाकडी, ता. इंदापूर), डाॅल्बी मालक रोहित हणमंत धुमाळ (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), राहुल दिलीप माळशिकारे, दिपक सुभाष माळशिकारे, निखिल जालिंदर माळशिकारे (रा. माळशिकारेवाडी, कोऱ्हाळे बुद्रूक) यांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

Police
Pune Ganesh Mandals Electricity: पुण्यात २११३ गणेश मंडळांपैकी केवळ २०६ मंडळांना अधिकृत वीजजोडणी

गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान ट्रॅक्टर (एमएच ४२, क्यू २६४४) व त्याला जोडलेल्या ट्राॅली (एमएच ४२ बीएस २१२०) मध्ये डाॅल्बी संगीताच्या तालावर नृत्यांगणा सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव, अंगविक्षेप व बिभस्त नृत्य करत होत्या. वडगाव निंबाळकर पोलीसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी नृत्यांगणांसह मंडळाचे पदाधिकारी व प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये नोटीस देण्यात आली होती.

Police
Indapur Drought: पावसाने दडी मारली; इंदापुरातील खरीप पिके करपू लागली, शेतकरी कर्जाच्या चिंतेत

त्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने ही कायदेशीर कारवाई केल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांनी सांगितले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शासनाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मोहिते यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news