Baramati Fake IPS Officer: बारामतीत तोतया आयपीएसला पोलिसांकडून बेड्या

नोकरीच्या अमिषाने तरुणाची तब्बल ७ लाख ८५ हजाराची केली फसवणूक
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणाची तब्बल ७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोसीन इब्राहीम मनियार (रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती) या तोतयाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नियुक्तीपत्र आणि नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे तयार करून तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील तरुण आरीफ शहाजहान शेख व त्यांचा भाऊ यांना तोसीन मनियार याने स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. माझ्या मंत्रालयात मोठ्या अोळखी आहेत. अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरी लावतो असे आश्वासन दिले.

Arrested
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी झाल्याने जखमी मंदारने पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदविला जबाब

या आमिषाला बळी पडलेल्या आरिफ शेख याच्याकडून आरोपीने सुमारे ७ लाख ८५ हजार रुपये घेतले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्रे व नियुक्तीपत्र तयार करून दिले. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली होती.

याप्रकरणी आरिफ शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्याला नुकतीच अटक करण्यात आली.

Arrested
Market committee supervision fee: बाजार समित्यांच्या सचिव केडरचा मार्ग मोकळा; निधी जमा करण्यास मंजुरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी- पोलिस उपअधिक्षक मनीषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे व प्रवीण शिंगाडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.