शिवजयंतीनिमित्त बारामती शहर भगवेमय; चौका-चौकांत भव्य व्यासपीठे, देखावे

शिवराज्य प्रतिष्ठानकडून उभारण्यात आलेला आरमाराचा देखावा.
शिवराज्य प्रतिष्ठानकडून उभारण्यात आलेला आरमाराचा देखावा.

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीत शुक्रवारी (दि. 10) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शिवजयंतीनिमित्त चौका-चौकांत भव्य व्यासपीठे उभारण्यात आली होती. यानिमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. विविध मंडळांनी भव्य देखाव्यांची उभारणी करण्यासह सामाजिक उपक्रम राबविले.

कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सकाळी शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, नियोजन प्रमुख हेमंत नवसारे, राजेंद्र ढवाण, देवेंद्र शिर्के, प्रदीप शिंदे, सूरज सातव, सुनील सस्ते आदींची यावेळी उपस्थिती होती.

सायंकाळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये उंट, घोडे, पारंपरिक नृत्य, ढोल-ताशा, लाठी-काठी अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पार पडली. शिवराज्य प्रतिष्ठानतर्फे मराठा आरमाराचा आकर्षक देखावा उभारण्यात आला. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, सचिन सातव, महेश रोकडे, सुनील महाडीक, सिद्धनाथ भोकरे, सुभाष सोमाणी, प्रकाश पळसे, अनिता गायकवाड, किशोर सराफ, रोहित सराफ, बबलू देशमुख, करण वाघोलीकर, प्रताप जाधव, अमजद बागवान आदींनी शिवप्रतिमेचे पूजन केले.

शिवराज्य प्रतिष्ठानने भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ममराठा आरमारफचा देखावा उभा केला होता. हा आकर्षक देखावा बारामतीकरांचे लक्ष वेधून घेत होता. इचलकरंजी येथून हा देखावा आणण्यात आला. प्रतिष्ठानचे श्रीकांत जाधव, निलेश गायकवाड, चेतन जाधव, अतिश गायकवाड, गौरव जाधव, धनू बंडगर, प्रथमेश गायकवाड, सौरभ राठोड, श्रीकांत साळुंके, श्रीपाद कळसकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

महावीर पथ मार्गावर राजे ग्रूपच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्सचे प्रमुख किशोर शहा आदींनी उपस्थिती लावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news