Cancer Hospital Approval: बारामतीत कॅन्सर रुग्णालय उभारणीला मंजुरी! अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा — बारामती बनेल ‘मेडिकल हब’
Baramati Cancer Hospital Approval
Baramati Cancer Hospital ApprovalPudhari
Published on
Updated on

बारामती: कर्करुग्णांना स्थानिक स्तरावर उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांशी संलग्न कॅन्सर रुग्णालय मंजुरीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारामतीत तृतीय स्तरावरील कॅन्सर रुग्णालय उभारणीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासह सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातील रुग्णांची सोय होणार आहे.  (Latest Pune News)

Baramati Cancer Hospital Approval
Price Crash: टोमॅटोचा हंगाम वाया! शेतकऱ्यांना फक्त तोटाच — क्रेटला अवघे १५० ते २५० रुपये भाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीत हे रुग्णालय उभे राहत आहे. बारामतीत कॅन्सर रुग्णालय उभारणीचा मनोदय पवार यांनी अनेकदा बोलून दाखविला होता. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया जवळील एसटी कार्यशाळेची जागा घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा कटफळ गावच्या हद्दीत स्थलांतरीत केली जाणार आहे.

Baramati Cancer Hospital Approval
Pune matrimonial fraud: लग्नाच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणारा जयपूरकर आरोपी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

राज्य शासनाने बारामतीसह अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा आणि आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, जळगाव, रत्नागिरी, ठाणे आणि शिर्डी संस्थानचे रुग्णालय या नऊ ठिकाणी तृतीय स्तरावरील कॅन्सर उपचार केंद्रांच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे. कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री निमंत्रित सदस्य असणार आहेत.

Baramati Cancer Hospital Approval
Teacher Recruitment Maharashtra: शिक्षक भरतीची बिंदुनामावली प्रक्रिया तातडीने पूर्ण करा — शिक्षण आयुक्तांचे निर्देश

यासह तृतीय स्तरावरील संस्थांचे रूपांतर उच्च स्तरावरील संस्थांमध्ये करण्यास आणि या संस्थांची संख्या १३ पर्यंत वाढविण्यास शासनाने मंजूरी दिली. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, पुणे (बी.जे), नांदेड तसेच नाशिक व अमराती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कर्करोगासंबंधी पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Baramati Cancer Hospital Approval
Jain boarding Pune: जैन बोर्डिंगच्या जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असल्याची खातरजमा

बारामती बनणार मेडिकल हब

बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यासह आता कॅन्सर रुग्णालयाची भर पडत आहे. दंत आरोग्य महाविद्यालय बारामतीत सुरू करण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा मानस आहे. त्यामुळे बारामतीत आरोग्यविषयक सुविधा आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news