Baramati ATM Theft: बारामतीत एटीएम फोडून १४ लाखांची रोकड लंपास; पणदरेतील घटनेने खळबळ

पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा धाडसी डाव; दोन मशिन फोडली, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुक्यातील पणदरे येथील बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेलगत असणाऱ्या एटीएम सेंटरमधील दोन मशिन फोडत चोरट्यांनी एकूण १४ लाख १९ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Theft
Pune Traffic Diversion Anna Bhau Sathe Jayanti: अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वाहतूक बदल; जेधे चौक-सारसबाग परिसरात शनिवारी मार्ग बंद

माळेगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) पहाटे घडली. याप्रकरणी बॅंक ऑफ इंडियाच्या पणदरे शाखेचे व्यवस्थापक तुषार लिलाधर पाटील (रा. देशपांडे इस्टेट, इंदापूर रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.

Theft
Panshet Dam Water Level: पानशेत धरण ९८ टक्के भरले; वांजळवाडी सांडव्याचे दरवाजे उघडले, मुठा नदीत विसर्ग वाढला

पणदरेतील पेट्रो कंपनीचे एक एटीएम मशीन असून, हे मशीन फोडत त्यातून चोरट्यांनी ११ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यात १०० रुपयांच्या १४१७, २०० रुपये दराच्या १५९० तर ५०० रुपये दराच्या १४६६ नोटांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी हिताची कंपनीची दुसरी मशीन असून, त्यातून २ लाख २६ हजार ४०० रुपयांची रक्कम काढण्यात आली. दोन्ही मशीनमधून एकूण १४ लाख १९ हजार १०० रुपये लंपास करण्यात आले. तसेच एटीएम मशीन व सीडीएम मशीन फोडून नुकसान केले.

Theft
Pune Beautification Work: भरपावसात भिंतींचे सुशोभीकरण; रंग वाहून गेल्याने पुणे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

चोरट्यांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याचे दिसून येत आहे. परंतु, मशीनला असणाऱ्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले. तीन-चार जणांनी हे कृत्य केले. तत्पूर्वी याच चोरट्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथेही एटीएम सेंटर फोडत लूट केल्याचे समोर आले आहे.

Theft
Pune FDA Action: पुणे विभागात एफडीएचा दणका; २१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित

घटनास्थळी माळेगावचे पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने भेट देत पाहणी केली. फाॅरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करत ठसे व इतर बाबी गोळा करण्यात येत आहेत. त्याद्वारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी केलेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news