पुणे : अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत बंगळूर स्मॅशर्स नवा संघ

पुणे : अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत बंगळूर स्मॅशर्स नवा संघ
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा' तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेत 'बंगळूर स्मॅशर्स' या नव्या संघाचाही समावेश असणार आहे. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या मालकीचा हा संघ असून, यानिमित्ताने त्यांनी क्रीडा क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. बालेवाडी क्रीडा संकुलात 13 ते 30 जुलै या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेच्या 4 थ्या हंगामाला सुरुवात होणार असून, एकूण सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंज होणार आहे. यामध्ये यू मुंबा, पुणेरी पलटण, गोवा चॅलेंजर्स, दबंग दिल्ली आणि कोलकाता हे संघ नेहमीप्रमाणे यंदाही कायम राहणार आहेत. तर चेन्नई लायन्सची जागा बंगळूर स्मॅशर्स या नव्या संघाने घेतली आहे.

बालन हे अल्टिमेट खो-खो, टेनिस लीग, प्रीमियर बॅडमिंटन लीग आणि हँडबॉल लीगमधील फ्रँचायझीमध्ये गुंतवणूकदार आहेत. तसेच प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये महाराष्ट्र आयर्नमेन संघाचे स्वामित्वही त्यांच्याकडे आले आहे.

जगभरात ओळख असलेल्या आणि नामांकित खेळांडूंचा समावेश असलेल्या 'अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धे'च्या निमित्ताने मला सहभाग मिळाला याचा आनंद होत आहे. टेबल टेनिस भारतात आता लोकप्रिय खेळ होत आहे. त्याच्या प्रचारासाठी आम्ही या माध्यमातून आणखी योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची संधीही मिळाली आहे.

                                – पुनीत बालन, मालक, बंगळूर स्मॅशर्स संघ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news