Babasaheb Patil Amit Shah: सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांकडून अमित शहांचे कौतुक; ‘त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला बळ’

RBIच्या कारवाईनंतर पाटलांची भाजप नेत्यांवरील स्तुती चर्चेत; पुण्यात सहकार विभागाच्या २१ इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण
Babasaheb Patil
Babasaheb Patil Pudhari
Published on
Updated on

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार काम करीत आहे. शहा यांना सहकार माहिती असून, त्याचा आवाका व त्याची ताकदही माहिती आहे. त्यामुळे केंद्रात प्रथम सहकार खाते निर्माण करण्यात आले. अजितदादा पवार आणि अमित शहा यांच्या कामामध्ये काहीच बदल नाही.

Babasaheb Patil
PDCC Bank Directors: पीडीसीसी बँकेतील ज्येष्ठ संचालकांची धाकधूक वाढली; दहा वर्षांच्या नियमामुळे पदावर टांगती तलवार

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीत सहकार खात्याची बैठक घेतात आणि वेळ पाळून ते राज्यांच्या सहकार मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न समजून घेतात, याचा मी साक्षीदार आहे. एवढं गांभीर्याने शहा सहकारात काम करीत असल्यामुळेच देशात सहकार क्षेत्र वाढण्यास मदत होत आहे, अशा शब्दांत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्तुती केली. सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी राहून नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने पाटील यांना नुकतेच बडतर्फ केले आहे.

Babasaheb Patil
Indapur Zilla Parishad Nominated Member: इंदापूरच्या स्वीकृत जिल्हा परिषद सदस्यपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; भरणेंसमोर समाजनिहाय समीकरणांचे आव्हान

त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप नेत्यांची केलेली स्तुती सोमवारी येथे चर्चेचा विषय ठरली. सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात २१ इलेक्ट्रिक चारचाकी वाहने ( टाटा कर्व ईव्ही) खरेदी करण्यात आली असून, या गाड्यांचे वितरण सहकारमंत्री पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात सोमवारी (दि.२१) करण्यात आले. स्वतः सहकारमंत्रीही गाडीत बसले आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

Babasaheb Patil
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत ९७.७८ टक्के पाणीसाठा; चार दिवसांत किरकोळ घट

तत्पूर्वी बँकेच्या सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले, की अजितदादा आणि सहकाराचे एकच नाव आहे. त्यांचे नाव घेतल्याशिवाय सहकार पूर्ण होऊ शकत नाही.

Babasaheb Patil
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात मुलाखतीसह १० हजार शिक्षकांची भरती सुरू होणार; मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण

सहकार चळवळ सध्या अडचणीत येत आहे. मात्र, जिल्हा बँकांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर चांगले काम करीत आहेत. सहकार विभागातील अधिकाऱ्यांना वाहने देण्याची कल्पनाच मुळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची होती. दादांच्या राजकारणाची सुरुवात पीडीसीसी बँकेतून झाल्यामुळे आम्ही सहकार विभागाऐवजी याच बँकेत हा कार्यक्रम घेतल्याचे नमूद करताच सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेंद्र देवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहकारचे अपर निबंधक सचिन रावल यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news