

बिबवेवाडी: कष्टकऱ्यांचे, श्रमिकांचे नेते डॉ बाबा आढाव यांचे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. मंगळवारी शासकीय इतमात पुण्यातील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
त्यानंतर कोणतेही कर्मकांड न करता बाबांच्या अस्थींचे मार्केट यार्ड येथील हमाल भवन च्या प्रारंगणात बाबांच्या पत्नी शीलाताई आढाव थोरले चिरंजीव असीम आढाव, व अंबर आढाव त्याचप्रमाणे विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चाफ्याचे झाडाच्या बुंध्याखाली अस्थींचे विसर्जन केले आणि चाफ्याचे झाड लावून श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.
आम्हा कष्टकरांचे दैवत असणारे बाबा यांनी संपूर्ण आयुष्यात कोणतेही कर्मकांड केले नाही किंवा कोणत्या गंगेत ,नदीत विसर्जन केले नाही, आयुष्याची अखेर होत असताना देखील त्यांचे तत्व पाळून बाबांच्या कुटुंबीयांनी व सर्व कार्यकर्ते, संघटनांनी बाबांचे अस्थींचे विसर्जन चाफ्याचे झाड लावून केले आहे ज्यामुळे आमच्यावर सतत बाबांचा आशीर्वाद व त्यांची सावली आमच्यावर सतत राहील तसेच चाफ्याचा सुगंध गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सतत राहील या हेतूने आज हमाल भवन येथे अस्थि विसर्जन केले आहे.
संतोष नांगरे.
यावेळी बाबा आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव, ज्येष्ठ चिरंजीव असीम आढाव, अंबर आढाव, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे,सचिव विशाल केकाने हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे खजिनदार चंद्रकांत मानकर , दत्तात्रय डोंबाळे, संदीप मारणे, संदीप धायगुडे, नितीन पवार, पौर्णिमा चिक्करमाने, शोभा नांगरे, ऍड शारदा वाडेकर, हुसेन पठाण, श्रीरंग भिसे इत्यादी उपस्थित होते.