

पुणे: आयुष्य कोमकर याचा गोळ्या झाडून खून केल्या प्रकरणात फरार असलेल्या कुख्यात बंडू आंदेकर टोळीच्या फरार झालेल्या चार जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात येथून बेड्या ठोकल्या.
शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 31), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60, सर्व रा. नानापेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात 13 आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात करण्यात आली आहे. (Latest Pune News)
या प्रकरणात यापूर्वी टोळीचा म्होरक्या सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय 70,), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40), अमन युसुफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (वय 20, भवानी पेठ), यश सिद्धेश्वर पाटील (वय 19) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19, दोघेही रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 सप्टेंबर रोजी आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष सातच्या सुमारास गेला. त्या आणण्यासाठी आयुष गेल्यानंतर घराच्या पार्कींगमध्ये गाडी पार्क करत असताना त्याचा निघृणपणे गोळ्या झाडून आंदेकर टोळीने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. दरम्यान या प्रकरणात फरार झालेल्या काहींना पुण्यातून तर काहींना बुलढाणा येथून अटक करण्यात आली होती.
मात्र गुन्ह्यातील महत्वाचे पाच आरोपी फरार होते. तेव्हापासून गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींचा माग काढत होती. दरम्यान गुन्हेशाखेच्या पोलिसांना आरोपी हे गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चारही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस