पुणे : पूर्वीच्या भांडणातून कुर्‍हाडीने वार

पुणे : पूर्वीच्या भांडणातून कुर्‍हाडीने वार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून एकावर कुर्‍हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भवानी पेठेतील काशेवाडी येथे घडला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी देवा ऊर्फ सिध्दार्थ संजय कांबळे, नजीर सलीम शेख (वय 29), आसीफ बाबूलाल शेख (वय 22, सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ) तसेच अदनान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सराईत आसीफ शेख आणि नजीर शेख यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत साहिल अंबादास भोगे (वय 20, रा. व्यापारी तरुण मंडळाजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल भोगे व त्याचा मित्र यांची फेब—ुवारीमध्ये संशयित आरोपी देवा कांबळे याच्यासोबत भांडणे झाली होती.  या आधीच्या भांडणाचा राग मनात धरून 10 सप्टेंबरच्या पहाटे अडीचच्या सुमारास साहिल हा गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहुन घरी जात असताना आरोपी देवा फिर्यादीजवळ आला.

त्याला धमकी देऊन नजीर शेखने त्याच्या कंबरेला लावलेली कुर्‍हाड काढली. ती देवाने हातात घेऊन साहिलच्या गालावर वार केले. यादरम्यान साहिल खाली कोसळल्यानंतर इतरांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नाईक  करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news