औंध जिल्हा रुग्णालयात आता आयुष रुग्णालय

औंध जिल्हा रुग्णालयात आता आयुष रुग्णालय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नवीन 30 खाटांच्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण दूरद़ृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी नवीन 100 खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारत भूमिपूजनही पार पडले. या वेळी आमदार अश्विनी जगताप, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

30 खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत 8 कोटी 99 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
नवीन 100 खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारतीसाठी 40.05 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या रुग्णालयात प्रतीक्षा कक्ष, वैद्यकीय कक्ष, मुख्य वैद्यकीय कक्ष, क्लिनिक रूम, तपासणी कक्ष, भांडार कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, नवजात शिशू कक्ष, आयसोलेशन वॉर्ड आयसोलेशन डॉक्टर्स रूम, नर्सेस एरिया, एचडीयू, अतिदक्षता विभाग आणि इतर सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

काय सुविधा?

तळमजल्यावर योगा हॉल, प्रतीक्षा कक्ष, अभिलेख कक्ष, उपाहारगृह, प्रक्रिया कक्ष, वैद्य कक्ष, मुख्य वैद्य कक्ष, पी.जी. एम आयुर्वेद कक्ष, स्वच्छतागृह, वैद्यकीय अधिकारी होमियोपॅथी, वैद्यकीय अधिकारी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, मड बाथ नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथी सुविधा उपलब्ध आहेत. पहिल्या मजल्यावर गर्भसंस्कार हॉल, मीटिंग हॉल, विशेष कक्ष, स्वच्छतागृह, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय अधिकारी रूम, स्क्रब रूम, शस्त्रक्रिया गृह, रिकव्हरी रूम, शस्त्रक्रियापूर्व दक्षता कक्ष, पुरुष कक्ष, महिला कक्ष, प्रतीक्षा कक्ष, शुश्रुषा कक्ष अशा सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news