पुणे : फुकट काजुकतली दिली नाही म्हणून गोळीबाराचा प्रयत्न

crime
crime

पुणे : पुढारी वृत्तसेवा : काजूकतली फुकट दिली नाही म्हणून मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सुरज मुंडे याला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली. घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले.

मात्र हा प्रकार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनेचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच दुकानात बंदुकीतून पडलेली गोळी ताब्यात घेऊन तपासली असता,ती खरी असल्याचे लक्षात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाससह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news