Mahatma Gandhi Statue Vandalism: महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; माथेफिरूकडून कोयत्याने तोडफोड करण्याचा प्रयत्न

या घटनेमुळे सर्वत्र संताप; आरोपी ताब्यात
Pune News
महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; माथेफिरूकडून कोयत्याने तोडफोड करण्याचा प्रयत्न Pudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना केली. त्याने पुतळ्यावर कोयता मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी (दि. 6) रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी माथेफिरू सूरज शुक्ला (वय 35, रा. विश्रांतवाडी; मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीच्या कृत्याचे विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी यांनी निषेध नोंदविला आहे, तर पुणे काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. (Latest Pune News)

Pune News
Pune NGO: पुणे विभागातील 500 स्वयंसेवी संस्थांना 22 कोटींचा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्ला हा खासगी नोकरदार आहे. रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास तो रेल्वे स्थानकाच्या परिसरात कोयता घेऊन आला होता. त्या वेळी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक प्रवासी होते.

माथेफिरू शुक्ला हा महात्मा गांधींचा पुतळा असलेल्या चौथर्‍याजवळ गेला. त्याने पुतळ्यावर कोयता मारून पुतळ्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नागरिकांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सूरज शुक्ला याला चौथर्‍यावरून उतरवून ताब्यात घेतले.

माथेफिरू शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा असून, नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तके विकत होता. काही दिवस तो सातार्‍यातील वाई येथे राहायला होता. पुण्यात आल्यानंतर त्याने कोयता विकत घेऊन पुतळ्याची विटंबना केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याने नेमके हे कृत्य का केले? याची माहिती पोलिस घेत आहेत.

काँग्रेसकडून संताप; पुतळ्याला दुग्धाभिषेक

पुणे रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची भगवे वस्त्र परिधान केलेल्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Pune News
Pune Property Tax: तीस टक्के पुणेकरांनी घेतला ‘सवलतीतील करभरणा’चा लाभ

शहर काँग्रेसकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करीत या घटनेचा निषेध करण्यात आला. मागील 12 वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, ही घटना त्याचेच प्रतीक असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.

सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा

कोर्टाने काय बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही बांगड्या घातल्या नाहीत? असे म्हणत न्यायालयाचा अवमान करणार्‍या सूरज आनंद शुक्ला (वय 35, रा. विश्रांतवाडी, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यास न्यायालयाने एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी त्याला सोमवारी (दि. 7) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news