

मंचर : गिरवली (ता. आंबेगाव) येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. 19) दुपारी घडली. या हल्ल्यात सागर गभाले (रा. हनुमानवाडी, गिरवली ता. आंबेगाव) व मिलिंद हगवणे (रा. भैरवनाथवाडी, गिरवली, ता. आंबेगाव) हे जखमी झाले आहेत. सागर गभाले व मिलिंद हगवणे हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला आहे.
गभाले यांच्या हाताला जखम झाली आहे, तर हगवणे यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. भैरवनाथवाडी व हनुमानवाडी परिसरातील पाच जनावरांवर या कोल्ह्याने हल्ला केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. वनविभागाला घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या कर्मचार्यांनी दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती संतोष सैद यांनी दिली.