पुणे : नेमणूक एकीकडे, काम दुसरीकडे

पुणे : नेमणूक एकीकडे, काम दुसरीकडे
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत अधीक्षक पदापासून वरिष्ठ लेखनिक पदापर्यंतचे शेकडो कर्मचारी बदलीनंतर नेमणूक झालेल्या खात्यात रुजू होत नाहीत. त्यांचे जुन्या खात्यावरील प्रेम कमी होत नसल्याने नेमणूक एका ठिकाणी आणि काम दुसर्‍या ठिकाणी केले जात आहे. अशा प्रकारे जवळपास 145 कर्मचार्‍यांची मनमानी सुरू असल्याचे समोर आले आहे.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारामध्ये महापालिकेतील लेखनिक प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी मागवली होती. या यादी प्रमाणे लेखनिक प्रवर्गातील 145 अधिकारी व कर्मचारी कामाला एका कार्यालयात आणि नेमणूक दुसर्‍या खात्यात असल्याचे समोर आले आहे. अशा मनमानी पद्धतीने काम करणार्‍यांना विभागप्रमुखांची साथ मिळत आहे.

विभागप्रमुख अशा कर्मचार्‍यांना काम देत असतील तर बदल्यांचे धोरण रद्द करावे, किंवा धोरणाला खो देणार्‍या विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच बदल्यांच्या धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news