पिंपरी : रिंगरोडला शेतकर्‍यांकडून मिळतोय हिरवा कंदील !

पिंपरी : रिंगरोडला शेतकर्‍यांकडून मिळतोय हिरवा कंदील !
Published on
Updated on

वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समितीने घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असल्याने एकप्रकारे शेतकर्‍यांकडूनच हिरवा कंदील मिळत आहे. त्यामुळे आता रिंगरोड सुसाट सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहराच्या वर्तुळाकार भागात असलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार्‍या प्रस्तावित रिंगरोडच्या गेल्या काही महिन्यांपासून वेग आला असून, जमिनीचा दर निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत संपादित होणार्‍या जमिनीचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समितीची स्थापना

मावळ तालुक्यातील उर्से येथील संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे पाहिले खरेदीखतही काही महिन्यांपूर्वी झाले असून काही ठिकाणी जमिनीच्या मोबदल्यावरून अडचणी निर्माण झाल्याने दि. 9 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समिती नेमण्यात आली.
या समितीने निर्धारित केलेल्या अंतिम मोबदल्यानुसार बुधवारी मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हयातील पहिली बैठक मौजे मातेरेवाडी (मुळशी) येथे खातेदारांचे संमतीपत्र व करारनामे करणेकामी आयोजित करण्यात आली होती.

संमतीपत्र देण्यास शेतकरी तयार

या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने निर्धारित केलेला गट निहाय मोबदला संबंधीत खातेदारांना कळविण्यात आला. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने निश्चीत केलेला मोबदला हा समाधानकारक असून, बहुतांश सर्वच खातेदारांनी निश्चीत केलेल्या दराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, सर्वच शेतकरी हे संमतीपत्र देण्यास तयार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी अधिकार्‍यांचे औक्षण करुन स्वागत केले क सत्कारही करण्यात आला. या वेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीने निश्चीत केलेला मोबदला हा समाधानकारक असून त्याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पुणे व प्रशासनाचे आभार मानले. तसेच, समाधानकारक मोबदला निश्चीत केल्याने फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

रिंगरोड या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समितीच्या माध्यमातून दर निश्चित करण्यात आला असून, हा दर शेतकर्‍यांच्यादृष्टीने समाधानकारक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून संमतीपत्र, करारनामा करण्यास परवानगी मिळत आहे. हेच प्रस्तावित रिंगरोडच्या दृष्टीने यशस्वी पाऊल आहे.
                                                    – संदेश शिर्के, उपविभागीय अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news