

पिंपरी : सातत्याने होणार्या तापमान बदलामुळे सध्या सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. शहरातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणार्या रुग्णांमध्ये सध्या 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात काही प्रमाणात ही साथ नियंत्रणात होती. मात्र, नोव्हेंबरपासून पुन्हा या आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे आणि हवेचा दाब कमी झाला आहे. सध्याचे वातावरण विषाणूंच्या वाढीस पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शहरामध्ये गोवर आजाराचे आत्तापर्यंत 5 बाधित रुग्ण आढळल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. झिका, जॅपनीज इनसिफेलायटिस या आजाराचा सध्या एकही रूग्ण शहरात आढळलेला नाही. मात्र, त्या दृष्टीने आवश्यक दक्षता महापालिका वैद्यकीय विभागाकडून घेण्यात येत आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सध्या ताप, सर्दी आणि खोकला या आजाराचे दररोज 80 ते 100 बालरुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभागप्रमुखसांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालयात सध्या तापाचे काही रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. सर्दी, ताप, खोकला आदी आजाराच्या रुग्णांची संख्या सध्या 20 टक्क्याने वाढली आहे. दिवाळीपासूनचही रुग्णसंख्या वाढत गेली आहे.
– डॉ. वर्षा सुपे, निवासी वैद्यकिय अधिकारी