Vaishnavi Hagawane Case: काय कारवाई केली?, रुपाली चाकणकरांना महिलांनी कस्पटे कुटुंबाच्या घराबाहेरच घेरलं
पुणे: वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पती, सासू, नणंद, सासरे यांच्या छळामुळे कंटाळून वैष्णवीने 9 महिन्यांच्या लगहान मुलाला मागे सोडत आत्महत्या केली. याप्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. (Latest Pune News)
यावेळी वैष्णवी हगवणे यांच्या हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव व अश्विनी खाडे व इतरांनी जाब विचारला. महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडियासमोर बोला. तुम्ही मयुरी जगताप आणि अश्विनी कस्पटे व अश्या इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असे धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावले. यावेळी रुपाली चाकणकर या काही उत्तर न देताच तिथून निघून गेल्या.
यावेळी मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव,बाळासाहेब आमराळे ,राकेश गायकवाड, गणेश मापारी, जितेंद्र कोंढरे, उत्तम कामठे, अनिकेत भगत , अतिष शेडगे, राकेश रेपाळे, तानाजी शेवाळे , अनिल बालवडकर, संतोष कराळे , अश्विनी खाडे, हर्षा मोरे, सारिका जगताप, शामल मोहोळ, पुजा धनंजय जाधव- मोरे श्रुतिका पाडळे, कामिनी मेमाणे, भाग्यश्री बोरकर उपस्थित होते.

