पुणे : ‘पुढारी’चा फोन जाताच बसविल्या फरश्या; यंंत्रणा तातडीने हलली
पुणे; पुढारी वृत्तसेवा : गत तीन महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मचे काम केले. मात्र, या प्लॅटफॉर्मवरील फरशा उखडल्या. त्यामुळे रेल्वेत चढ-उतर करताना प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत दै. 'पुढारी'ने रेल्वे प्रशासनाला फोन करून माहिती विचारताच त्यांची तातडीने दखल घेत काही तासांत नवीन फरश्या बसविण्यात आला. तीन महिन्यांत फरश्या उघड्या पडल्याने पूर्वी केलेले काम दर्जाहीन झाल्याचे समोर आले आहे.
शिवाजीनगर स्थानकावरील तुटलेल्या फरश्यांची माहिती घेतली. तातडीने तेथे दुरुस्ती करून घेण्यात येईल. तसेच संबंधित काम दिलेल्या एजन्सीवर आणि आमच्या कर्मचार्यांवरसुद्धा अशाप्रकारे दर्जाहीन कामांबद्दल कारवाई करण्यात येईल.
– ब्रिजेशकुमार सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग
शिवाजीनगर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसत आहे. येथे बर्याच ठिकाणी भेगा, उघडलेल्या फरशा आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
– आनंद सप्तर्षी, रेल्वे सल्लागार
समिती सदस्य, पुणे

