Artificial Sand Unit Pune: कृत्रिम वाळू युनिटसाठी अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

एम-सॅण्ड धोरणानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर; अर्ज सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत
कृत्रिम वाळू युनिटसाठी अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कृत्रिम वाळू युनिटसाठी अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) युनिट स्थापन करण्यासाठी यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.(Latest Pune News)

कृत्रिम वाळू युनिटसाठी अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Katraj Kondhwa Road Widening Pune: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम जूनपर्यंत पूर्ण करणार : आयुक्त नवल किशोर राम यांची ग्वाही

राज्यातील कृत्रिम वाळू धोरण जाहीर झाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध असून, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या संकेतस्थळावरही पाहता येणार आहेत.

एम-सॅण्ड युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेत सादर करणे बंधनकारक आहे.

कृत्रिम वाळू युनिटसाठी अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Raju Shetti Loan Waiver Demand: उपमुख्यमंत्र्यांसमोर राजू शेट्टींकडून कर्जमाफीची ठाम मागणी

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावी लागणार आहे

सातबारा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सीटीई परवाना, शंभरच्या स्टॅम्प पेपरवरील शंभर टक्के एम-सॅण्ड उत्पादनाबाबतचे हमीपत्र, अर्ज शुल्क 500 रुपये तसेच दगडाच्या पुरवठा स्रोताचा तपशील सादर करावा लागणार आहे.

यापूर्वी ‌‘महाखनिज सॉफ्टवेअर प्रणालीवर एम-सॅण्डसाठी अर्ज केलेल्या युनिटधारकांनाही पुन्हा नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा,‌’ असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news