

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील अनियमिततेमुळे आगमन लांबणीवर टाकलेल्या स्थलांतरित पक्ष्यांपैकी काही पक्षी उजनी धरण परिसरात दाखल झाले आहेत. पळसदेव, काळेवाडी, डिकसळ, डाळज या उजनी काठावरील गावांच्या विस्तृत पाणीसाठ्यावर समुद्र पक्षी अर्थात गलपक्षी पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.
दक्षिण रशिया, पूर्व मंगोलिया, पॉलिआर्क्टिक, हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील सरोवराला वीण घालणारे व सागरी किनार्यावर मासेमारी करणारे विविध प्रजातींचे गलपक्षी उजनी जलाशयावर हिवाळ्यात येतात. त्यापैकी "ब्लॅक हेडेड गल" मागील आठवड्यात दाखल झाले आहेत.