शुद्ध तूप वापरून शेणाची सुगंधी पणती; पुण्यातील महिलांनी एकत्र येत केला अनोखा प्रयोग

शुद्ध तूप वापरून शेणाची सुगंधी पणती; पुण्यातील महिलांनी एकत्र येत केला अनोखा प्रयोग
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वंशाचा दिवा किंवा पणती जसे जीवन फुलवतात तसेच उत्सवातील चैतन्य खुलविण्याचे काम एक साधी पणती करू शकते, हे दाखवून दिले आहे गोठवडे गावातील महिलांनी. त्यांनी गायीचे शेण, मुलतानी माती व गायीचे तूप याच्या लगद्यातून पर्यावरणपूरक पणती तयार करून शेकडो महिलांच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. याबरोबरच आरोग्यदायी वीस उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना देत आहेत.

पुणे शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर असणार्‍या मुळशी रस्त्यावर गोठवडे ही वाडी आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची खरी किंमत कोरोनाकाळात समजली. कारण, कोरोनाला रोखण्यासाठीची आयुर्वेदिक उत्पादने महिलांनी देशी गायीच्या पंचगव्यापासून तयार केली. त्यामुळे कोरोनाचा प्रवेश या गावात झाला नाही. तोच प्रयोग सर्वांपर्यंत पोहचविला. महिलांचे हे अनोखे अस्तित्व जगासमोर जावे, यासाठी जिजामाता महिला ग्रामसंघ तयार केला. यात गावातील 140 महिला सहभागी झाल्या. या संघाच्या अध्यक्षा साधना भगत, वंदना दाभाडे, स्वाती भेगडे व वंदना भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील
सर्व महिला एकमेकींना सहकार्य करतात.

'वेस्टपासून बेस्ट'ची निर्मिती…
गावातील देशी गायींच्या पंचगव्यापासून (शेण, गोमूत्र, दूध, तूप, दही) वीस प्रकारची विविध आयुर्वेदिक उत्पादने महिला तयार करू लागल्या. यात जिवामृत, कडुनिंबाच्या रसापासून अगरबत्ती व डास पळविण्यासाठी विद्युत उपकरणांत वापरले जाणारे द्रव तसेच सर्दी-खोकल्यावर गुणकारी अनेक आयुर्वेदिक उत्पादने तायर केली जातात.

अनोखी पणती…
गायीचे शेण, मुलतानी माती, लाकडी भुसा, गायीचे शुध्द तूप, भीमसेनी कापूर वापरून पणतीचा लगदा तयार केला जातो. ती पर्यावरणपूरक राहावी म्हणून या पणतीला रंगरंगोटी टाळतात. हीच पणती वापरल्यावर झाडाला खत म्हणून घालता येते. याच लगद्यापासून धूप, छोट्या गवर्‍या, सुगंधी उटणे दिवाळीसाठी तयार केले जाते. दोन वर्षांपासून त्यांच्या कामाची माहिती पुणे शहरातील महिलांना तोंडी प्रचारानेच झाल्याने त्यांच्या या आयुर्वेदिक उत्पादनाला मागणी वाढली तर आहेच, शिवाय त्यांचा गटही अधिक सक्षम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news