वाघोली-लोहगाव पाणी योजनेला मान्यता

वाघोली-लोहगाव पाणी योजनेला मान्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या वाघोली आणि लोहगाव या दोन गावांसाठी महापालिकेने पाणी पुरवठा योजनेच्या 283 कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सूस-म्हाळुंगे या गावांसाठी तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ आता वाघोली-लोहगाव या गावांसाठी तयार केलेल्या सुमारे 283 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली आहे.

या योजनेतून 60 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जाणार आहे. योजनेसाठी भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उपलब्ध होणार आहे. भामा आसखेड योजनेतून महापालिकेला प्रतिदिन 200 एमएलडी इतके पाणी मंजूर आहे. त्यापैकी सध्या 120 एमएलडी इतेकच पाणी महापालिका उचलत आहे. या भागातील 2041 ची लोकसंख्या गृहीत धरून वाघोली-लोहगाव पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार केला आहे.

मेट्रोला दिले 194 कोटी रुपये

महापालिका मेट्रोला सुमारे चारशे कोटी रुपयांचे देणे आहे. त्यापैकी सुमारे 194 कोटी रुपये गेल्या दोन महिन्यांत मेट्रोला दिले आहेत. यामध्ये 'टीओडी'चा वाटा म्हणून 40 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठते, त्या ठिकाणी मेट्रोने अद्याप उपाययोजना केल्या नाहीत. महापालिकाच आता या भागात काम करणार असून, या कामांचा खर्च हा मेट्रोला देणे असलेल्या रक्कमेतून वजा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news