पिंपरी : आयुक्तालय सफाईसाठी कर्मचारी नियुक्तीस मान्यता

पिंपरी : आयुक्तालय सफाईसाठी कर्मचारी नियुक्तीस मान्यता

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्तालयाच्या सफाईसाठी 37 कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात स्वच्छता राहणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. दरम्यान, आयुक्तालयासह पोलिस ठाणे, विविध विभाग व शाखा यासाठी सफाई कामगार उपलब्ध व्हावेत, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत आयुक्तालयाकडून वरिष्ठ प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य शासनाच्या गृह विभागाकडून 17 एप्रिल 2023 रोजी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी 37 सफाई कामगार नियुक्त करण्यास मान्यता मिळाली आहे. बाह्य यंत्रणेव्दारे ही नियुक्ती होणार असून सफाई साहित्याच्या 79 लाख 81 हजार 788 रुपये खर्चासह ही मंजुरी देण्यात आली आहे. चिखली पोलिस ठाण्यासाठी देखील स्वतंत्र इमारत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पूर्णानगर, चिखली येथील मध्यवर्ती सेवा केंद्रातील 900 चौरस मीटर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी 23 लाख 95 हजार 250 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news