

वडगाव मावळ(पुणे) : मावळ-मुळशीच्या उपविभागीय अधिकारीपदी (प्रांताधिकारी) सुरेंद्र नवले यांची नियुक्ती झाली आहे. तर, मावळमधून बदली झालेले तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळकायदा शाखेत नियुक्ती
झाली आहे. मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांची रायगड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून एक महिन्यापूर्वी बदली झाली होती. त्यानंतर सुभाष भागडे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या राज्यातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये सुरेंद्र नवले यांची मावळ-मुळशीच्या प्रांताधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मावळ तालुक्याचे तहसीलदार म्हणून चार वर्षे कार्यरत असलेले तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची महिन्यापूर्वी गडचिरोली येथे बदली करण्यात आली होती. दरम्यान, त्यांची गडचिरोली येथे झालेली बदली रद्द होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळकायदा शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा