

यवत: पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने अपर पोलीस आयुक्त पुणे शहर पदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Pune News)
सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप सिंग गिल्ल हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित आहेत. पुणे शहरातील कोयता गॅंगला वडणीवर आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी संदीपसिंग गिल्ल कशाप्रकारे प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे