Pregnancy Anomaly Scan: बालमृत्यू रोखण्यासाठी मोठा निर्णय; उच्च जोखमीच्या गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ अनिवार्य

जन्मजात विकृती वेळेत ओळखण्यासाठी सरकारची पावले; शासकीय-खासगी रुग्णालयांना आदेश
Pregnancy Anomaly Scan
Pregnancy Anomaly ScanPudhari
Published on
Updated on

पुणे : राज्यातील बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च जोखमीच्या गर्भवतींसाठी ‌‘ॲनॉमली स्कॅन‌’ तपासणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, प्रसूतिगृहे, स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग तसेच सोनोग््रााफी केंद्रांना आदेश जारी करण्यात आले आहेत. गर्भातील बाळामध्ये जन्मजात विकृती असल्यास ती वेळेत ओळखता यावी आणि आवश्यक वैद्यकीय निर्णय घेता यावेत, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Pregnancy Anomaly Scan
Pune Traffic Congestion: पुण्यात वाहतूक कोंडीला हॉटेल्स जबाबदार? बेकायदा पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बालमृत्यू सर्वेक्षण अहवालाच्या अभ्यासात जन्मजात विकृती हे बालमृत्यूचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूंपैकी सुमारे पाच ते सहा टक्के मृत्यू जन्मजात विकृतींशी संबंधित असल्याचे आढळले आहे. 2023-24 मध्ये एकूण बालमृत्यूंपैकी 6.34 टक्के मृत्यू अशा विकृतींमुळे झाले होते. हे प्रमाण 2024-25 मध्ये 6.6 टक्क्यांपर्यंत वाढले, तर 2025-26 या आर्थिक वर्षात (ऑक्टोबरपर्यंत) ते 6.7 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च जोखमीच्या गर्भवतींची विशेष तपासणी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pregnancy Anomaly Scan
BJ Medical College: स्वायत्ततेच्या प्रक्रियेत बी.जे. मेडिकल वगळले? राज्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

काय आहे ॲनॉमली स्कॅन?

‌‘ॲनॉमली स्कॅन‌’ ही गर्भावस्थेतील महत्त्वाची सोनोग््रााफी तपासणी असून, ती साधारणपणे 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत केली जाते. या तपासणीद्वारे गर्भातील अवयवांची वाढ, संरचना आणि संभाव्य विकृतींचा अंदाज घेता येतो. 2024-25 पासून राज्यातील शासकीय रुग्णालयांत गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीत ही तपासणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये ती सशुल्क असते. प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिनंतरच्या सुमारे निम्म्या सेवा खासगी आरोग्य संस्थांतून दिल्या जात असल्याने या तपासणीची अंमलबजावणी खासगी क्षेत्रातही अनिवार्य करण्यासाठी शासनाने शासननिर्णय काढला आहे. तपासणीदरम्यान गर्भात गंभीर विकृती आढळल्यास संबंधित कुटुंबाला समुपदेशन करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास वैद्यकीय गर्भपाताचा पर्यायही विचारात घेतला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Pregnancy Anomaly Scan
Onion Farmers Crisis: कांदा उत्पादकांचा आक्रोश : ‘जगायचे की मरायचे?’; दर कोसळल्याने शेतकरी हतबल

उच्च जोखमीच्या गर्भवती कोण?

35 वर्षांपेक्षा जास्त किंवा 18 वर्षांखालील गर्भवती

गर्भावस्थेदरम्यान ‌‘टॉर्च‌’ संसर्ग (टॉक्सोप्लाझ्मोसिस, रुबेला, साइटोमेगालो व्हायरस, हर्पिस इ.) झालेल्या गर्भवती

मातेला मधुमेह, हृदयविकार, थायरॉईडसारखे वैद्यकीय विकार असणे किंवा कुपोषण

आयव्हीएफसारख्या सहाय्यक प्रजनन तंत्राद्वारे गर्भधारणा झालेली असणे

Pregnancy Anomaly Scan
Kerosene Distribution Maharashtra: राज्यात रॉकेल वितरण पुन्हा सुरू? ३७.४४ लाख लिटर कोटा निश्चित

डाऊन सिंड्रोम, ट्रायसोमी 18 किंवा 13 यांसारख्या गुणसूत्रीय विकृतींचा धोका

पूर्वी जन्मजात विकृती असलेले अपत्य, वारंवार गर्भपात किंवा मृतजन्माचा इतिहास

जवळच्या नात्यातील विवाह

गर्भावस्थेत मद्यपान, धूमपान किंवा विषारी रसायनांचा संपर्क

फॉलिक ॲसिडची कमतरता, तीव रक्तक्षय किंवा इतर पोषणाशी संबंधित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news