Anand Dighe Mandal Registration: ‘आनंद दिघे’ मंडळ नोंदणीसाठी थेट मदत; पुणे RTOकडून विशेष सुविधा सुरू

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी हेल्पलाइन व विशेष कर्मचारी नियुक्त; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ
Anand Dighe Mandal Registration
Anand Dighe Mandal RegistrationPudhari
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक-मालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक-मालक कल्याणकारी मंडळांतर्गत सभासद नोंदणी प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना रिक्षाचालकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी विशेष पाऊल उचलले असून, कार्यालयात मदतीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला आहे. तसेच, विशेष हेल्पलाइन क्रमांकही जारी केला.

Anand Dighe Mandal Registration
Pune Dog Shelter: डॉग शेल्टर...तात्पुरता की दीर्घकालीन तोडगा?

अनेक रिक्षाचालकांना इंटरनेट कॅफेवर जाऊन किंवा मोबाईलवरून स्वतः अर्ज भरताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन पुणे आरटीओने सोमवार ते शुक्रवार या दिवसात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी रिक्षा, टॅक्सीचालक-मालकांना मंडळाचे सदस्य नोंदणी प्रक्रियेचे थेट मार्गदर्शन करणार आहेत.पात्र अर्जदारांनी https:/// ananddighekalyankarimandal. org/ home/ register या लिंकवर जाऊन नोंदणी पूर्ण करावी.

Anand Dighe Mandal Registration
Kerosene Distribution Maharashtra: राज्यात रॉकेल वितरण पुन्हा सुरू? ३७.४४ लाख लिटर कोटा निश्चित

हेल्पलाइन क्रमांकाचाही आधार

आरटीओ कार्यालयाला फक्त प्रत्यक्ष भेटच नव्हे, तर दूरध्वनीवरून मदतीसाठी आरटीओने 020-26058080 हा विशेष हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ज्या लाभार्थ्यांना काही शंका असतील किंवा अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल, त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

महामंडळात नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

लायसन्स) आणि बॅज

वाहन परवाना (परमिट)

आधार कार्ड आणि पॅन कार्ड

रेशन कार्ड

Anand Dighe Mandal Registration
Stove Comeback Pune: युद्धाचा परिणाम चुलीपर्यंत! गॅसटंचाईमुळे पुण्यात पुन्हा स्टोव्हचा ‘जुन्या काळाचा’ कमबॅक

नुकतेच पार पडले मार्गदर्शन शिबिर

प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजीत डोंगरजाळ यांनी नुकतेच विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकारी आणि रिक्षा, टॅक्सीचालकांना कल्याणकारी महामंडळाचा ऑनलाइन सदस्य नोंदणी अर्ज कसा भरायचा? याची शिबिरामध्ये सविस्तर माहिती दिली. तसेच, त्यांना हा अर्ज भरण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news