यवत येथे पुणे शहर पोलिसांच्या पथकावर गोळीबार

डोंबिवली
डोंबिवली
Published on
Updated on

यवत: पुढारी वृत्तसेवा : यवत(ता. दौंड) परिसरातील मानकोबा वाडा भागात मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्ती कडून पुणे शहर पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी गुन्ह्याच्या तपासासाठी यवत भागातील मानकोबा वाडा परिसरात मंगळवारी रात्री आले होते.

त्यावेळी त्यांनी एक जणाला ताब्यात घेतले असता असून एक जण पळून जात असताना त्याने पुणे शहर पोलिसांच्या वर गोळीबार केला असून यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती पुणे शहर पोलिसांनी यवत पोलिसांना दिली. यवत पोलीस स्टेशनचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news