दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्यापैकी सहा सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सिलिंडरचा साठा कोणी केला, याची माहिती घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.– आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक