दारूमुळे वास्तुविशारद झाला दुचाकीचोर : अखेर चोरट्याला अटक

दारूमुळे वास्तुविशारद झाला दुचाकीचोर : अखेर चोरट्याला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक करून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रशांत प्रभाकर कान्हेकर (वय 47, रा. साहिल सोसायटी, बिबवेवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. प्रशांतने वास्तुविशारद अभ्यासक्रम केला आहे. दारूचे व्यसन असल्याने त्याने नोकरी गमावली. दारूचा खर्च भागवण्यासाठी दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली.

धनकवडी भागात गस्त घालणारे पोलिस नाईक अमोल पवार आणि विशाल वाघ यांना याची माहिती मिळाली. प्रशांत धनकवडीतील स्वातंत्र्यवीर चौकात थांबला होता. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याने तीन दुचाकी चोरल्याचे उघड झाले. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक फौजदार बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, नीलेश शिवतारे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news