Amit Thackeray: "मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मगच पोलिसांना द्या"; अमित ठाकरे यांचा संतप्त इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुलींच्या सुरक्षेवरून आक्रमक भूमिका घेतली.
Amit Thackeray
Amit ThackerayPudhari
Published on
Updated on

Amit Thackeray

मुंबई : पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुलींच्या सुरक्षेवरून आक्रमक भूमिका घेतली. "मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या," असा संतप्त इशारा अमित ठाकरे यांनी दिला.

पुण्यातील कोंढवा भागात रविवारी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, "जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल, पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत. मी पालकांशी बोलायला आलो आहे, की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही आहोत."

राजकीय हतबलतेतून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र : मुख्यमंत्री फडणवीस

राजकीय हतबलतेतून ठाकरे बंधू एकत्र, असा टोला लगावतानाच विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना मी दिलेली ऑफर हा केवळ विनोद होता, आमच्याकडे आता जागाच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भविष्यात कोणत्याही युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंना महायुतीत येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी त्यांना गमतीने म्हणालो होतो की, 'तुम्हाला इकडे यायचे असेल तर विचार करू.' तो केवळ एक विनोद होता कोणतीही ऑफर नव्हती. माझ्या विनोदाच्या बातम्या झाल्या. मात्र, आता त्यांना ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, आमच्याकडे जागाच नाही. २८८ सदस्यांच्या विधानसभेत आमच्यासोबत २३२ सदस्य आहेत, त्यामुळे इतरांसाठी जागाच उरलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news