आंबेगाव तहसील कार्यालयाचे 'डिजिटल' व्यासपीठ; व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलद्वारे नागरिकांच्या मोबाईलवर मिळणार माहिती

Manchar News
आंबेगाव तहसील कार्यालयाचे 'डिजिटल' व्यासपीठ; व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलद्वारे नागरिकांच्या मोबाईलवर मिळणार माहिती file photo
Published on
Updated on

मंचर: प्रशासन आता जनतेच्या दारी नव्हे, तर थेट त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पोहचत आहे. आंबेगाव तहसील कार्यालयाने डिजिटल युगाशी सुसंगत असा अभिनव उपक्रम हाती घेत अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना, महत्त्वाचे निर्णय, प्रमाणपत्रासंबंधी मार्गदर्शन, हवामानविषयक माहिती, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, महसूल, निवडणूक आदी विभागांची माहिती नियमितपणे मिळणार आहे.

या माध्यमातून नागरिकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक फेर्‍यांपासून सुटका होणार आहे. तहसील कार्यालयात नागरिकांना चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी ”व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल” सारखी सहज वापरता येणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Latest Pune News)

Manchar News
Baneshwar Temple: बनेश्वर मंदिरात दर्शनावेळी शर्ट काढण्याचा नियम रद्द? धर्मादाय आयुक्तांकडे ठराव पाठविणार

या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. काही ग्रामपंचायतींनी तर त्यांच्या स्तरावरून नागरिकांना या चॅनेलमध्ये जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा असल्याचे नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी सांगतिले.

कोणती माहिती मिळणार ?

तहसील कार्यालय आंबेगाव नावाने सुरू केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवरून नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज कसा करायचा, कुठे सादर करायचा याचे मार्गदर्शन, नोंदणीप्रक्रिया, हवामान अंदाज, पीकविमा योजनांची माहिती, शासकीय आदेश, निवडणुकीशी संबंधित सूचना आणि आपत्तीपूर्व खबरदारीबाबतच्या सूचनाही मिळणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

Manchar News
Pune Accident: डंपरच्या धडकेत पीक-अपमधील दोघे ठार; मांडवगण फराटा येथील दुर्घटना

तहसील कार्यालय आंबेगाव या चॅनेलमुळे गावपातळीवर सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सबस्क्राइब करण्यासाठी नागरिकांना फक्त संबंधित लिंकवर क्लिक करून जॉइन बटन दाबावे लागेल. कोणताही अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. एकदा चॅनेल जॉइन केल्यावर सर्व अपडेट्स थेट मोबाईलवर मिळणार आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत असून, कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करावी लागत नाही. या चॅनेलद्वारे माहितीचा वेग वाढेल, गैरसमज कमी होतील आणि लोकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक बळकट होईल.

- संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news